Uncategorized

भीम आर्मी व आझाद समाज पार्टीचे पुसदमध्ये भव्य आंदोलन 🚨जंतर-मंतर वरील विद्यार्थी आंदोलनाला समर्थन..

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466पुसद – नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरण, दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराचा निषेध तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ भीम आर्मी भारत एकता मिशन आणि आझाद समाज पार्टी (कांशीराम) यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद शहरात भव्य निषेध आंदोलन व मोर्चा काढण्यात आलाआहे .

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागण्या जोरदार घोषणाबाजीद्वारे मांडल्या.त्यानंतर अशोक भालेराव भीम आर्मी महाराष्ट्र राज्य संघटक, राजकुमार भगत आझाद समाज पार्टी (का.)जिल्हाध्यक्ष यवतमाळ,विशाल डाके आझाद समाज पार्टी जिल्हामहासचिव,अजय लोखंडे, भीम आर्मी तालुका उपध्यक्ष, वैभव सूर्यवंशी,व शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी, पुसद यांची भेट घेऊन मा.राष्टपत्ती यांना नावे निवेदन सादर केलेआहे .

निवेदनामध्ये नीट परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच देशभरातील विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले . प्रशासनाने निवेदन स्वीकारून ते राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले. आंदोलनात भीम आर्मी भारत एकता मिशन, आझाद समाज पार्टी (कांशीराम) तसेच विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्णआंदोलनादरम्यान शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त राखत आंदोलन शांततेत पार पडला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button