शासन योजना माहिती अभावी अनेक गरजु लाभार्थी वंचितअलताफ हुसेन

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
MPJ च्या माहिती केन्द्रा च्या उद्घाटना प्रसंगी प्रतिपादनउमरखेड : भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत सामान्य नागरिकांमध्ये आपल्या मूलभूत अधिकारांबाबत पुरेशी जागरूकता निर्माण झालेली नाही. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना उपलब्ध असतानाही माहितीअभावी अनेक गरजू नागरिक या योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि शासनाच्या योजनांची मोफत माहिती मिळावी, यासाठी उमरखेड येथे माहिती केंद्र सुरू करण्यात आल्याचे MPJ चे प्रदेश उपाध्यक्ष अलताफ हुसेन यांनी प्रतिपादन केले .

ते शांती आणि न्यायासाठी चळवळ मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस उमरखेडच्या वतीने नाग चौक येथील अबरार कॉम्प्लेक्समध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दि २६ रोजी माहिती केंद्राची उद्घाटन प्रसंगी बोलत होते .
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, नागरिकांचे घटनात्मक हक्क व मूलभूत अधिकार यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, तसेच गरजू नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने
माहिती केंद्राची स्थापना करण्यात आले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी MPJचे प्रदेश उपाध्यक्ष अल्ताफ हुसेन होते. उद्घाटक डॉ. आरिफ अबरार, तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षण सभापती रसूल पटेल, नगर सेवक गणेश खंदारे, काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल, युसुफ सौदागर, राजू कवाने, नाहीद नवाब , सिराज हक , महेमुद खान, खाजा भाई उपस्थित होते.
या केंद्राच्या माध्यमातून अनाथ, दिव्यांग, विधवा तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य, शासनाच्या आरोग्य सुविधा, औषधोपचार, शिक्षणाच्या सुविधा आदींबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे अन्सार हुसेनी यांनी सांगितले.

“शासनाच्या योजना सामान्य नागरिकांसाठी आहेत; मात्र त्या नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना त्याचा योग्य लाभ मिळणे आवश्यक आहे. या माहिती केंद्राच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शांती, संविधान आणि आपल्या अधिकारांबाबत जागृती करण्याचे काम केले जाईल,” असे अल्ताफ हुसेन यांनी स्पष्ट केले.
डॉ. आरिफ अबरार यांनी या सामाजिक उपक्रमासाठी आपली जागा उपलब्ध करून देत माहिती केंद्राला सहकार्य केले. तसेच नागरिकांना योजनांची माहिती मिळवून देण्यासाठी आणि केंद्राचे काम प्रभावीपणे चालविण्यासाठी त्यांनी लॅपटॉप भेट दिला.


यावेळी MPJचे सचिव गजानन दामोदर, देवानंद मोरे तसेच पुसदचे नगरसेवक ॲड. वसीम अहमद यांनीही आपले विचार व्यक्त केले.
उद्घाटन सोहळ्यास नगरपरिषदेचे शिक्षण सभापती रसूल पटेल, नगर सेवक गणेश खंदारे, काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल, युसुफ सौदागर, राजू कवाने, नाहीद नवाब , सिराज हक , , महेमुद खान, खाजा भाई यांच्यासह शहरातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते सह तस्लीम अहेमद ,सैय्यद रजा , शफील राज , समीर अहेमद , मोहसीन खान ,तौफिक तवर, तौफिक राज, जहीर मंसुरी , साबीर शेख, फाजील भाई, आय्युब मुळावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते
शहरामध्ये सुरू झालेले हे माहिती केंद्र नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. फारूक अबरार यांनी संचालन फिरोज अन्सारी यांनी केले. तर आभार मोहसीन राज यांनी केले.



