Uncategorizedक्राइम गुन्हा

लोणेरे येथील ओंकार रेसिडेन्सी लॉजवर तरुणीवर अतिप्रसंग करून अत्यंत क्रुरपणे निर्घृण खून, आरोपी फरार

तीन दिवस उलटूनही आरोपीस अटक नाही, पोलिस प्रशासनाला २४ तासाचा अल्टिमेटम

Oplus_131072

२५ एप्रिल रोजी सर्वपक्षीय, सर्व धर्मिय बहुजन समाजाकडून गोरेगाव व लोणेरे शहर बंद चा इशारा बोरघर माणगांव ( विश्वास गायकवाड )

रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील गोरेगांव विभाग अंतर्गत वडगांव येथील २२ वर्षिय पल्लवी प्रवीण मोरे या तरुणीची लोणेरे येथील ओंकार रेसिडेन्सी लॉजमध्ये १९ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत क्रुर पद्धतीने निर्घृण हत्या करुन आरोपी पसार झाला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण माणगाव तालुक्यासह रायगड जिल्हा हादरून गेला आहे.

राज्यात दिवसेंदिवस महिलांवर होणारे हल्ले आणि अत्याचार यामुळे राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी राज्यातील जनतेची समज झाली आहे.
सदर घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप पोलीस यंत्रणेला अरोपी पकडण्यात अथवा त्याला अटक करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर राजकीय दबाव आणि हस्तक्षेप होत असावा असे जनतेचे जनमत निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व समाजात पोलिस प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी जनतेने पोलिस प्रशासनाला चोवीस तासांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. तर मुलीच्या पालकांनी सदर आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.

सदर घटनेच्या आणि पोलीस यंत्रणेच्या तपासातील दिरंगाई च्या निषेधार्थ शनिवारी दिनांक २५ एप्रिल रोजी माणगाव तालुक्यातील आणि गोरेगाव विभागातील सर्व पक्षीय नेते मंडळी आणि संपूर्ण बहुजन समाज यांच्या माध्यमातून शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी भारतीय जनता पार्टी, वंचीत बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राका, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट,भारतीय कॉग्रेस पार्टी यांच्या सह सर्व बहुजन समाज यांच्या माध्यमातून संपूर्ण गोरेगांव शहरातून प्रचंड मोठ्या संख्येने पोलीस प्रशासनाच्या विरोधात जन अक्रोश मोर्चा काढण्याचा आणि ठिय्या आंदोलन करून गोरेगांव आणि लोणेरे शहर बंद चा इशारा दिला आहे.

त्यानंतर गोरेगांव पोलीस स्टेशन राजमाता जिजाऊ मैदानात बेमुदत ठिय्या आदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल. या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे गोरेगाव येथे सर्व समाज घटक आणि सर्व पक्षीय नेते यांनी बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित केलेल्या सर्व पक्षीय, सर्व धर्मिय बहुजन समाज सभेच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात आले आहे.


सदर सभेस नानासाहेब महाले जिल्हा उपाध्यक्ष भाजप, अरुण चाळके शिवसेना नेते,बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे , सचिव आर डी साळवी , उप सचिव रंजीत मोहिते, पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग अध्यक्ष विकास दादा गायकवाड, शिवसेना उबाठा दक्षिण जिल्हा सल्लागार नरेश आहिरे, वसंत शिगवण शिवसेना शहर प्रमुख, सुर्यकांत कासे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सचिव, मधुकर नाडकर तालुका संघटक उबाठा, रोहण साळवी पंचशील युवा अध्यक्ष, नितेश लोखंडे बौपस सचिव गोरेगाव, शैलेश लोखंडे, धनंजय पवार,अमर गाडे आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

सदर सभेत उपरोक्त सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आपापल्या मनोगतातून संतापजनक शंका आणि प्रश्न उपस्थित केले. स्थानिकांच्या मते सदर घटनेत एका पेक्षा अधिक आरोपी सहभागी असू शकतात अशी शंका व्यक्त केली. तर काहींच्या मते आरोपी हे गोरेगाव परिसरातीलच असावेत त्यांना वाचवण्यासाठी पोलीस आपली दिशाभूल करत आहेत असे मत व्यक्त केले. तर काहींच्या मते या घटनेला ओंकार रेसिडेन्सी लॉजचे व्यवस्थापन देखील तितकेच जबाबदार आहे. कारण त्यांनी आपल्या लॉज मध्ये संबंधित आरोपी आणि संबंधित मुलीच्या आयडी अर्थात आधार कार्ड वरुन सखोल चौकशी केली असती आणि लॉज परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सिस्टीम ॲक्टिव्ह ठेलली असती तर ही घटना घडलीच नसती. त्यामुळे या गंभीर प्रकरणात संबंधित लॉज व्यवस्थापनाला पोलीसांनी सह आरोपी करुन घेतले पाहिजे अशी ठाम मतं व्यक्त केली. आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात २५ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव आणि लोणेरे बंदची हाक देत जन आक्रोश मोर्चा जन आंदोलनाचा ठाम निर्धार केला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!