www.google.comउमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकियशहरशैक्षणिकसामाजिक

उमरखेडमध्ये शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाची मागणी

🔮 प्रेषित पैगंबर मुहम्मद स. यांच्या जयंतीनिमित्त अभियानादरम्यान SIOचे आमदारांना निवेदन

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड : प्रेषित मुहम्मद स. यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या अभियानादरम्यान SIO महाराष्ट्र उत्तर विभागाचे प्रतिनिधी फरीद झईम यांनी उमरखेड येथे भेट देऊन उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसानराव मारोती वानखेडे यांना निवेदन सादर केले. प्रेषित मुहम्मद स. यांनी ज्ञान, शिक्षण आणि समाजाच्या बौद्धिक विकासाला विशेष महत्त्व दिले. त्यांच्या या शिकवणीतून प्रेरणा घेत, समाजातील प्रत्येक घटकाला समान, गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक असल्याचे SIOने यावेळी मांडले. उमरखेड व परिसरातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे प्रवास, निवास व भोजनाचा अतिरिक्त आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडतो. म्हणून उमरखेड येथे शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यासोबतच मतदारसंघातील शाळा व महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालये, डिजिटल शिक्षण व स्वच्छतागृहांची व्यवस्था बळकट करावी आणि मुली, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. अभियानाच्या माध्यमातून प्रेषित मुहम्मद स. यांच्या अंतिम भाषणातील मानवी हक्क, समानता, मानवी प्रतिष्ठा आणि न्यायाच्या संदेशावरही प्रकाश टाकण्यात आला. सुमारे १४०० वर्षांपूर्वी अराफातच्या मैदानात दिलेल्या या ऐतिहासिक भाषणात मानवाची प्रतिष्ठा, समानता, जीवन व संपत्तीची सुरक्षितता आणि परस्पर न्याय यांसारख्या मूलभूत मानवी मूल्यांवर भर देण्यात आला होता. या संदेशाचे स्मरण म्हणून आमदारांना ‘प्रेषित मुहम्मद स. यांचे अंतिम भाषण’ मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र या विषयावरील फ्रेम भेट देण्यात आली.

अभियानाचा भाग म्हणून आमदारांना प्रेषित मुहम्मद स. यांच्या जीवनावर आधारित पुस्तकेही भेट देण्यात आली. ज्ञान, शिक्षण, न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीचा प्रेषितांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी SIO महाराष्ट्र उत्तर विभागाचे कार्यकर्ते व प्रतिनिधी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button