सुकळी (ज.) येथे तंटामुक्त अध्यक्ष पदी डॉ.अयुब खां पठाण यांची समितीची सर्वानुमते निवड


✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
उमरखेड – सुकळी (ज.), ता. उमरखेड : गावातील शांतता, सामाजिक सलोखा व आपसी बंधुभाव कायम राखण्याच्या उद्देशाने आयोजित ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच सौ. श्रद्धा ज्ञानेश्वर बोके यांनी कामकाज पाहिले. ग्रामसभेमध्ये अध्यक्षपदी डॉ. अयुबखा पठाण, उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत उर्फ बाळू गंगात्रे, सचिवपदी ओंकार जाधव, सहसचिवपदी शे. निसार शे. बशीर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच समितीच्या सदस्यपदी कैलासराव वानखेडे, सूर्यभान पाटील वानखेडे, संतोषराव वानखेडे, लक्ष्मणराव कदम, सुनील खेडकर, गजानन वानखेडे, अनंता नरवाडे, अरविंद बडेराव, गणेश राठोड आणि शे. मोहम्मद शे. हुसेन यांची निवड करण्यात आली.यावेळी श्रीमती संगीताताई दशरथराव वानखेडे मा. पंचायत समिती सदस्य, श्री. ज्ञानेश्वर कनवाळे सोसायटी अध्यक्ष मारोतराव वानखेडे मा. सरपंच),चुन्नुमियाजी काजी मा. सरपंच, शे. बशीर भाई मा. उपसरपंच यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.नवनिर्वाचित तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील तंटे व वाद सामोपचाराने सोडविणे, सामाजिक एकोपा वाढविणे आणि गावात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी सकारात्मक व प्रभावीपणे कार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.ग्रामसभेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी व सदस्यांची एकमताने निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.




