नाथनगर,साईमंदिर जवळ पुजा वाॅटरफिल्टर या नवीन प्रतिष्ठाणचा सौ. निधीताई नितीनजी भुतडा यांचे हस्ते शुभारंभ

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

उमरखेड – शहरात प्रतिष्ठीत आणि फुलांची नगरी म्हणून नाथनगरचा उल्लेख होतो. आजच्या घडीला या ठिकाणी खुला प्लाॅट मिळणे अवघड झाले आहे. ज्याकाही श्रीमंत व्यक्तीने काही वर्षापूर्वी येथे प्लाॅट खरेदी करुन पैसा गुंतवला ‘त्या’ त्या प्लाॅटची पंधरापट जास्त किंमत झाली आहे. नाथनगर, साईमंदिर जवळ पुजा वाॅटर फिल्टरचा शुभारंभ निधीताई भुतडा यांचे शुभहस्ते करण्यात आला . पुजा वाॅटर फिल्टर शुद्ध थंड व साधे पाणी फिल्टरसाठी सर्वांत चांगली सर्विस देणार्या नवीन मशनरी खरेदी करण्यात आल्या.


उमरखेड शहरात एक ना शेकडो वाॅटर फिल्टर आहेत .परंतू तेथील पाण्याची सुद्धता केव्हाच तपासणी होत नाही . संबंधीत विभागाचे अधिकारी येतात ,पाणी फिल्टर प्लाॅट विक्रेत्याकडून ओलीपार्टी खातात आणि पाॅकेट घेऊन उच्च प्रतिचे पाणी फिल्टरचा शेरा मारतात. शहरात चांगले व शुद्ध पाणी फिल्टर तिनच आहेत.

आठवडी बाजारातील विदर्भ ,रवीभाऊ चौधरी यांचे डाॅक्टर वाॅटर कुल व सध्या नवीन चालू झालेले पुजा पाणी फिल्टर सदर पाणी फिल्टरचा शुभारंभ नितीनजी भुतडा यांचे शुभहस्ते होणार होता. परंतू नितीनजी यांना दिल्ली येथील बैठकीसाठी उपस्थित राहणे महत्वाचे असल्याने ते दिल्लीला पोहोचले .त्यांचे एवजी सौ. निधीताई भुतडा यांनी पुजा पाणी फिल्टरचा रिबिन कापत शुभारंभ केला.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी जेष्ठ सैनिक रविभाऊ रुडे, चव्हाण काका,संजय रुडे, पुजा रुडे , सरपंच श्रद्धा बोके मॅडम,त्रिशा रुडे,प्रियांश रुडे, नितीन सोनाळे ,धनराज मस्के,सदाशिव अनखुळे, शिवा वैद्य ,सिद्धू बोके, सेवानिवृत्त तलाठी डोंगरे ,रुडे काकू, सौ. ससाने ताई यांचे सह नातलग ,मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.



