उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरशैक्षणिकसामाजिक

वारकरी परंपरेचा भक्तिमय सोहळा; शहीद भगतसिंग नगर परिषद शाळा क्र. २ मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

उमरखेड : शहीद भगतसिंग नगर परिषद शाळा क्र. २, उमरखेड येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि भारतीय संस्कारांचा जागर करणारा भक्तिमय सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत साकारलेली दिंडी, रिंगण, अभंग, भारूड तसेच मनमोहक सांस्कृतिक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण शाळा परिसर “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी”च्या जयघोषाने विठ्ठलमय झाला होता.

कार्यक्रमास योगायोगाने काही कामानिमित्त उपस्थित असलेले बबलू जाधव पाटील यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे महत्त्व, संतांच्या शिकवणीतील जीवनमूल्ये, भक्ती, समता आणि संस्कारक्षम शिक्षणाचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांचे त्यांनी विशेष कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक आशिष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, संयोजन आणि यशस्वी आयोजन गोपाल मुनेश्वर (शारीरिक शिक्षण) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री अंकुश राजे यांनी केले, तर आभार प्रदर्शनही त्यांनीच केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. अंजली राजपूत, सौ. माया बन्सोड, श्री विजय सूर्यवंशी, श्री समीर पठाण, श्री विकास गिरी, सौ. मनीषा पडलवार, सौ. नेहा कन्नावर, सौ. सविता पोंगाने, सौ. स्मिता वानखेडे, सौ. शिवपूजा बारे, सौ. जयश्री शिंदे, श्री किरण वैद्य, सौ. रेखा व्यवहारे, वाढवे काकू तसेच श्री पंकज राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले.

कार्यक्रमातील संस्मरणीय क्षणांचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण कु. मिनल रहाटे यांनी उत्कृष्टरीत्या केले.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा वारकरी सोहळा भक्तिमय, संस्कारमय आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक करत शाळेच्या उपक्रमशीलतेचे अभिनंदन केले.शहीद भगतसिंग नगर परिषद शाळा क्र. २, उमरखेड येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित वारकरी दिंडी, रिंगण व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवर.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button