Uncategorized

नायगावच्या मातीत शांत झाली संघर्षाची महागाथा!

*राष्ट्रपतीं मा.प्रतिभा ताई पाटील व मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मा. न्यायधीश डॉ. नामदेव चव्हाण साहेब यांनी गौरविलेल्या या आदर्श माते मुळे लाखो पिडीतांना न्याय मीळाला. कै. शेवराबाई ज्ञानदेव भोसले वयाच्या 95 व्या वर्षी निधन……. प्रांत.अधिकारी वैभव नारवडकर साहेब* प्रतिनिधी :स्नेहा उत्तम मडावी, आदर्श माता म्हणून राज्यभर गौरविलेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर सन्मानित झालेल्या शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांचे सोमवारी (दि. १३ जुलै २०२६) वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने आदिवासी पारधी समाजासह सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर हवेली तालुक्यातील नायगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.शेवराबाई भोसले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाचे संगोपन करत मुलांमध्ये समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाची मूल्ये रुजवल आहे.

त्यांच्या संस्कारातून महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले समाजसेवक नामदेव भोसले, साहित्यिक भास्कर भोसले आणि उत्कृष्ट पत्रकार म्हणून ओळखले जाणारे सुनील भोसले यांनी समाजहिताचे कार्य उभारले. विशेषतः नामदेव भोसले यांनी आदिवासी पारधी समाजाला गुन्हेगारीच्या कलंकातून बाहेर काढून शिक्षण, सन्मान आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रांत अधिकारी वैभव नारवडकर ..यांनी आपले मत व्यक्त केले . आहे

श्रद्धांजलीपर भाषणात सांगितले. या वेळी शेवराबाई यांच्या तेराव्या निमीत्त नारवडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सुनील भोसले यांनीही प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वंचित समाजाच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले. शेवराबाई यांनी आयुष्यभर समाजातील महिलांना स्वावलंबन, कष्ट आणि संघर्षाची प्रेरणा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांकडून तब्बल २९ पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

सन २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते, तर २०२१ मध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. प्रांत वैभव नारवडकर,व तहसीलदार. ऋषिकेश शेळके त्यांच्या पश्चात तुकाराम भोसले, भास्कर भोसले, महादेव भोसले, नामदेव भोसले, सुनील भोसले,आनिल महादेव तसेच मुली, सुना, आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी डॉ.

मधुकर आव्हाड, उद्योगपती जयवंत शितोळे-पाटील, सरपंच संभाजी खडके, विकास चौधरी, नामदेव शितोळे, रघुनाथ चौधरी, बाळासाहेब चव्हरे यांच्यासह नायगाव, पाटस, उरळी कांचन व परिसरातील ग्रामस्थ, पारधी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button