www.google.comअपराधअवैधक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

महागांव हददीत मौजे-धनोडा येथे अवैध देशी दारु वाहतुक करणा-या इसमांवर कारवाई!

🌍 (चारचाकी गाडी सह 30 बॉबी संत्रा देशी दारुचे बॉक्स एकूण किंमत 6,20,000/- रु मुददेमाल जप्त)

🚨स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दिनांक 25/08/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात ईद-ए-मिलाद बंदोबस्त तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, कामी रवाना झाले. पोलीस स्टेशन महागांव हददीत पेट्रोलींग करीत असतांना नमूद पथकांस गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, एक टाटा टियागो EV कंपनीच्या चारचाकी गाडीमध्ये इसम नामे-मनोज परसराम कदम रा. महागांव हा अवैधरित्या विनापरवाना गैरकायदा देशी दारु विक्री करीता घेवून जात असून तो चारचाकी गाडीसह धनोडा येथील जयस्वाल यांच्या दुकानासमोर थांबला आहे.

अशी माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे धनोडा येथे रवाना होवून सापळा लावून एक टाटा टियागो EV चारचाकी गाडी क्रमांक MH-29-CB-2623 गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये 10 पोते त्यामध्ये देशी दारु बॉबी संत्रा प्रत्येकी एका पोत्यात 03 पेट्या त्याप्रमाणे एकूण 30 पेटया प्रत्येक पेटीत 90 MI क्षमतेच्या 100 नग शिश्या प्रमाणे 10 पोत्यात 3000 नग देशी दारु बॉबी संत्राच्या शिश्या किंमत 1,20,000/- असा तसेच देशी दारु वाहतुक करीत असलेली चारचाकी गाडी असा एकूण 6,20,000/- रुपयेचा मुददेमाल जप्त करुन नमूद इसम मनोज परसराम कदम वय 40 वर्ष, रा. गणपती चौक वार्ड क्रमांक 16 महागांव ता. महागांव जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे कलम दारुबंदी कायदया अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा,अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि/धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ / मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button