www.google.comअपराधअवैधउमरखेडउमरखेड तालुक्यातीलक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरसामाजिक

उमरखेड : बीड जमादाराची ‘सर्वात मोठी’ जुगार डावावर कारवाई; केवळ ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त!

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड : – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड परिसरात टाइमपास म्हणून रमी खेळत असलेल्या चार जणांवर डॉ आंबेडकर वार्ड चे पोलीस बीड जमादार प्रकाश बोंबले यांनी धाड टाकून टाइमपास म्हणून रमी खेळत असलेल्या ४ व्यक्तींवर अष्टपैलू कारवाई केली. यावेळी चार व्यक्तीची झडती घेतली असता अवघ्या ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती खुद रमी खेळणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे. दरम्यान, इतक्या कमी रकमेच्या जप्तीमुळे शहरात या कारवाईची उपरोधिक चर्चा रंगली असून, “आतापर्यंतची सर्वात मोठी जुगार डावावर ची कारवाई” अशा शब्दांत नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

काही दिवसापासून उमरखेड शहरातील सर्वच जुगार आणि मटका हे अवैध धंदे ठाणेदार शंकर पांचाळ साहेब यांच्या पुढाकाराने बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखला आहे. त्यामुळे सर्व स्तरावरून ठाणेदार पांचाळ यांचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे अवैध धंद्यान विरोधात कोणताही अर्ज दाखल झाला नसला तरीही अवैध धंदे ठाणेदार पांचाळ यांनी कायमस्वरूपी बंद केली आहे अशी गोपनीय माहिती मिळाली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button