Uncategorized
सावळी येथे डॉ. बाबासाहेब आंबडकर यांची जयंती साजरी

✍🏻प्रविण घागरे (मानवत/प्रतिनिधी)
मानवत (दिनांक ३० एप्रिल) तालुक्यातील मौ. सावळी येथे २९ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.

यावेळी सकाळी ११ वाजता पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात त्यानंतर सायंकाळी ५ वाजता भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून प्रतिमेची भव्य अशी मिरवणुक गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली.

सायंकाळी ८ वाजता जयंती मिरवणुक विसर्जीत करण्यात आली यावेळी कार्यक्रम यशस्वीते साठी सावळी येथिल मुकनायक मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी प्रयत्न केले.