युनिव्हर्शल इंग्लिश मीडियम, ‘स्कुल, बेस्टा स्कूल’ पुरस्काराने सन्मानित

उमरखेड:- येथील युनिव्हर्सल इंग्लिश मेडीयम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्रातील १८,००० इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सदस्य संघटना असलेल्या ‘मेस्टा’ (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन) तर्फे शाळेला ‘बेस्ट स्कूल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


ठाणे-मुंबई येथील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या मेस्टाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा गौरव करण्यात आला.या सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संजय परमानंद माहेश्वरी आणि विद्यमान अध्यक्ष अॅड. संतोष जैन यांनी शाळेच्यावतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारलाआहे.

मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.MAHARASHTRA ENGLISH SCHOसंजय तायडे पाटील, राज्याध्यक्ष डॉ. प्राध्यापक नामदेवराव दळवी, विदर्भ अध्यक्ष किरण चौधरी, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार संजय केळकर, माजी आमदार निरंजन डावखरे, व्हि. सी.एस. विश्वस्त विमल सोमन यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


याच कार्यक्रमात शाळेतील चार शिक्षकांनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘बेस्ट टीचर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये सिंधू प्रेग्रेस जॉनसन (इंग्रजी), रमेश वाघमारे (गणित), विकास खांडेकर (क्रिडाव आरोग्य) आणि अश्वजीत मानकर (माहिती व तंत्रज्ञान) यांचा समावेश आहे. पुरस्कार वितरणावेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून अविनाश शिंगणकर व यादव लाखकर उपस्थित होते.

या यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्ष अँड. संजय माहेश्वरी, उपाध्यक्ष कमल माहेश्वरी, सचिव संतोष माहेश्वरी, माजी आमदार प्रकाश देवसरकर, माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर जयस्वाल यांच्यासह सर्व विश्वस्त, मुख्याध्यापिका मनिषा फुलेवार, विजया ठाकरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
