देवसरीत घरकुल लाभार्थ्यांना आदेशपत्रांचे वाटप सरपंच मीनाक्षी सावतकर यांच्याहस्ते वितरण,

देवसरीत घरकुल लाभार्थ्यांना आदेशपत्रांचे वाटप सरपंच मीनाक्षी सावतकर यांच्याहस्ते वितरण, कामांना मिळणार गती
उमरखेड, दि. २३ प्रतिनिधीतालुक्यातील श्रीक्षेत्र देवसरी येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा दुसरा अंतर्गत परकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनाना आदेश प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सरपंच मीनाक्षी सावतकर यांच्याहस्ते शनिवारी (दि.२२) आदेश पत्रांचे वाटप करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, सरपंच मीनाक्षी सावतकर यांनी सर्व लाभाध्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक तंत्रज्ञ अमोल देवराय यांनी केले. देक्सरी गावाला दुसऱ्या कृष्ण्याअंतर्गत एकूण ७५ घरकुलांचे उदिष्ट प्राप्त झाले असून, यापैकी ६५ लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ताजमा करण्यात आला आहे. उर्वरित सहा लाभाध्यांच्याही खात्यातही लवकरच रकम जमा होणार आहे.

पुणे येथेकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देवसरी येथे दाखविण्यात आले होते.

या कार्यक्रमात राज्यातील २० लाख परकुलांच्या मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे एक हजार ५०० कोटी रुपये वितरित करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्याला एक लाख २२ हजार ६०८घरकुलांचे उदिष्ट होते.

त्यापैकी एक लाख १२ हजार मंजूर झाले असून, १० हजार ६१६ लाभार्थ्यांच्या खात्यात १३५ कोटी रुपये जमा झाले आहेत. या कार्यक्रमासाठी उपसरपंच गजानन देवसरकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अंबोरे, कर्मबारी अंबादास देवसरकर, गजानन देवसरकर आणि रोजगार सेवक प्रभाकर सावते यांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम देवमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सभागृहात झाला.