डॉ. प्रा. मोहन मोरे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार…!
✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक महाराष्ट्र राज्य) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक 5 नोव्हेंबर) सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. आज उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून डॉ.प्रा मोहन मोरे हे निवडणूक लढणार आहेत. त्यांच्यासोबत एक मुलाखत घेताना ते म्हणाले की,यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपक्ष नेते मोठ्या आमदार घेऊन इकडे तिकडे पळत आहे. सत्ताधाऱ्यांनी अतिशय अन्याय शेतकऱ्यावर केलेला आहे. ज्या त्या शेतकऱ्याची पीक वाढते तेथे पीक इतर देशातून आयात केले जाते त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही. जे जे पीक जास्त प्रमाणात येते महाराष्ट्रात आणल्यामुळे कापसाचा भाव पडला.एका एका पक्षाचे दोन दोन तीन तीन पक्ष फुटून तयार होत आहेत. पक्षा पक्षांमध्ये फार मोठी आर्थिक हेडसांड होत आहे.

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आजपर्यंत पूर्ण केले नाहीत. त्याचा इतरत्व पैसा वळवत आहेत. दुसऱ्या नको त्या गोष्टी करत आहेत.
अशा प्रकारचा सत्याग्रहांचं काम महाराष्ट्र मध्ये चालू आहे.उमरखेड येथे भीम टायगर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने श्याम भाऊ धुळे यांच्या नेतृत्वाखाली संविधानाची जनजागृती होण्याकरिता व आपले हक्क व अधिकार जाणून घेण्याकरिता “संविधान बचाव परिषद” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मी उद्घाटक म्हणून उपस्थित होतो.उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून मी काम केले आहे आणि करत आहे आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून अपक्ष उमेदवार म्हणून मला भरघोस मतदान करून विजयी करावं माझी निशाणी दूरदर्शन (टीव्ही) असून या निशाणीवर एका शिक्क्याने मतदान करून मला विजयी करावं अशी सर्व मतदार बंधूंना भगिनींना तरुण मंडळीला माझी नम्रतेची विनंती आहे आपलाच डॉ. प्रा. मोहन मोरे (अपक्ष उमेदवार)अशी मुलाखात आमच्या उपसंपादक सिद्धार्थ दिवेकर यांना यावेळी आली दिली.यावेळी डॉ.प्रा. मोहनराव मोरे यांचे मोठ्या संख्येने समर्थक या ठिकाणी उपस्थित होते.
