Uncategorized

वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्त्या सोबत आढावा बैठक….

Oplus_131072

उमरखेड (दिनांक 4 नोव्हेंबर) वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीवर अतोनात प्रेम करणारे या सर्वांची उमरखेड येथे आदरणीय संभाजी मुनेश्वर सर यांच्या घरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आदरणीय तातेराव यांच्या प्रचाराच्या नियोजन करता बैठक आयोजित केली होती.

बैठकीमध्ये सर्वांना मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून विजयी करण्यासाठी विचार मांडले. महाराष्ट्र उपाध्यक्ष आदरणीय गोविंद दळवी साहेब यांनी सुद्धा उमरखेड ऊन जात असताना उमेदवाराला शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही जाहिरात स्वीकारण्यात येतील

तसेच बैठकीमध्ये यवतमाळ जिल्हा निरीक्षक आदरणीय प्रियदर्शनी तेलंग साहेब यांचे मार्गदर्शन लाभले सदर बैठकीस पक्षाचे उमरखेड तालुका अध्यक्ष संबोधी गायकवाड, महागाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद नवसागरे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक आदरणीय विजय लहाने साहेब, यवतमाळ जिल्हा महासचिव डि.के .दामोदर साहेब उमरखेड तालुका महासचिव आदरणीय संभाजी मुनेश्वर सर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आदरणीय धम्मदीप काळबांडे साहेब,अरविंद जी धोंगडे साहेब, विश्वास हापसे, विष्णू धुळे, प्रकाश वाहुळे, राहुल वाघमारे, बबन वाठोरे, धनंजय ढगे मिलिंद खडसे, प्रमोद ढगे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यामध्ये परिसरासाठी गाड्यांची नियोजन, तालुक्यामध्ये पक्षाचे पाच कार्यालय, प्रचाराच्या सर्व नियोजनावर चर्चा सविस्तर करून शेवटी आभार संभाजी मुनेश्वर सर यांनी मानले आणि बैठकीची सांगता झाली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!