आझाद समाज पार्टीचे जोरदार शक्तिप्रदर्शन देवानंद पाईकराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
उमरखेड (दिनांक ३० ऑक्टोंबर) उमरखेड विधानसभा मतदार संघातुन आझाद समाज पार्टी तर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत देवानंद पाईकराव यांनी 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.

जुने तहसील कार्यालया जवळून रॅली ची सुरुवात करण्यात आली शहरातील वसंतराव नाईक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मुख्य रस्त्याने विविध जाती समूहातील शेकडो कार्यकर्ते हातात विविध रंगाचे झेंडे घेत बहुजन महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेत महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणा देत रॅलीत सामील झाले.

यावेळी महिला पुरुषांसह युवकांची प्रचंड गर्दी युवकांनी अजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांचे बॅनर हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली, यावेळी आजाद समाज पार्टीचे उमेदवार देवानंद पाईकराव यांच्या नावाच्या घोषणांनी उमरखेड वरखेड शहर दनाणून टाकले होत.


जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, तालुका महासचिव सचिन वाहुळे, तालुका सचिव गौतम कांबळे, कुलदीप खडसे, युवा तालुकाध्यक्ष विष्णू वाडेकर, उमरखेड शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर, मार्शल बर्डे सर, ढाणकी शहराध्यक्ष गोलू मुनेश्वर, सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष अलीम कुरेशी, रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुका कार्यकारिणीचे प्रभू काळबांडे, आशिष काळबांडे , हर्ष काळबांडे, अतुल वाढवे,रवी पडघने,गजानन सावतकर समाधान राऊत, आबा गायकवाड, प्रवेश वाडेकर, उपसरपंच शंकरसूळ, संतोष भवाळ, सुधाकर कदम, गौतम कांबळे, बबलू भाऊ भालेराव पत्रकार, देवानंद पाईकराव, नागेश पाटील, अंकुश हनवते अंकुश वाघमारे, अनिल जोगदंडे, राहुल धुळे, रियाज भाई, रहीम भाई, संतोष मासोळकर,विलास मासोळकर, यांच्यासह शेकडो आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.