Uncategorized

बालसन्यासी अंकुश रंजकवाड उर्फ अनंतराज अमृते महाराज यांनी भरला नामांकन अर्ज

✍️ आत्तदिप धुळे (उमरखेड प्रतिनिधी) मो.9511953580

उमरखेड:- (दिनांक ३० ऑक्टोंबर) उमरखेड महागाव विधानसभेत सध्या निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अनेक पक्षाचे इच्छुक उमेदवार, अपक्ष उमदेवार नामांकन अर्ज दाखल केला आहेत.


मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने उमरखेड महागाव मतदार संघात बालसन्यासी अंकुश रंजकवाड उर्फ अनंतराज अमृते महाराज यांनी काल दिनांक २९/१०/२०२४ रोजी अनेक कार्यकर्त्यांसह घोषणा देत उमेदवारी अर्ज दाखल केला.श्रीराम मंगल कार्यालय पासून ते तहसील कार्यालय पर्यंत अनेक कार्यकर्त्यांसह घोषणा बाजी करत त्यांची रॅली काढण्यात आली.

उमरखेड महागाव विधानसभेच्या विकासासाठी मी कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार, युवक, यांचा स्तर उंचवण्याठी, विविध योजना रस्ते, विकास कामे, करण्याची संधी मला जनतेनी द्यावी अशी आशा व्यक्त केली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!