उमरखेड पोलिसांची हातभट्ट दारूवर धाड

(बेलखेड येथे 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; आरोपींना अटक)
✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 27 ऑक्टोंबर) तालुक्यातील बेलखेड परिसरातील कैलास नगर येथे हातभट्टी दारू काढत असल्याची गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून पोलिसांनी बुधवारी (दि. 23) मध्यरात्री नेहरू देवराव राठोड यांच्या राहत्या घरी धाड टाकुन 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, आरोपीं विरुद्ध विविध कलमानुसार कारवाई करण्यात आली.

तालुक्यातील बेलखेड येथील कैलास नगर येथे नेहरू देवराव राठोड (45) यांच्या घरी गावठी हातभट्टी दारू काढत असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांचे पथकासह पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी आपल्या कम’चाच्यासह मिळालेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता, सदर इसमाच्या घरी गावठी हातभट्टी बाराशे लिटर मोहाची दारू, 35 रुपये किलो प्रमाणे 42 हजार रुपये, तसेच 25 लिटर गावठी हातभट्टी दारूची मोठी कॅन शंभर रुपये लिटर प्रमाणे 2500
रुपये असा एकूण 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
कारवाई दरम्यान पोलिसांनी सडवा, मोहा जागीच नष्ट करून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नरेंद्र पुंड, रामदास इंगळे करीत आहे.