उमरखेड विधानसभा मध्ये आजाद समाज पार्टी कडून देवानंद पाईकराव यांना उमेदवारी जाहीर
- 📌 बबलू भालेराव [मुख्य संपादक]
- मो.9922870518,9637107518
✍️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक २७ ऑक्टोंबर)विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सर्व पक्षाने कंबर कसली असून यात आता आजाद समाज पार्टीची भर पडली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आजाद यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आजाद समाज पार्टीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले आहेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघात आजाद समाज पार्टीतर्फे पक्षाचे तालुकाध्यक्ष सुप्रसिद्ध प्रबोधनकार गायक सुशिक्षित उमेदवार देवानंद पाईकराव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी समूहाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे त्यातही खासदार चंद्रशेखर आझाद यांना मानणारा मोठा चाहता वर्ग या मतदारसंघात आहे. मागील काही महिन्यांपासून आझाद समाज पार्टी तर्फे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे,जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे यांच्या नेतृत्वात या मतदारसंघातील विविध समस्यांवर आंदोलने मोर्चे काढले असल्याने दलित शोषित पीडित वंचित घटक आदिवासी मुस्लिम समूहातील युवा वर्ग आजाद समाज पार्टीकडे आकर्षित झाल्याचे दिसून आले.मजबूत पक्ष संघटन कार्यकर्त्यांची मोठी फळी याच्या जोरावर आझाद समाज पार्टी मोठ्या प्रमाणात मतदान आपल्या झोळीत टाकण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत असल्यामुळे आझाद समाज पार्टी महाविकास आघाडीच्या विजयाचे गणित बिघडवण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.
यामुळे येणारे निवडणूक नक्कीच रंगदार ठरण्याची शक्यता आहे.