www.google.comअपराधक्राइम गुन्हाताज्या बातम्यानवी दिल्लीमहाराष्ट्रशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज; लोकशाहीची गळचेपी, देशभरातून संताप!

✍️सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

नवी दिल्ली (प्रतिनिधी): दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. हातात संविधान आणि तिरंगा घेऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अचानक करण्यात आलेल्या पोलिस कारवाईमुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे.

मात्र विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी केला आहे. या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा देशभरातील विविध स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच जखमी विद्यार्थ्यांना योग्य उपचार व न्याय देण्याची मागणीही जोर धरत आहे.

लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर संवादातून तोडगा काढणे हीच लोकशाहीची खरी ओळख असल्याचे मत अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button