उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषसन्मान सत्कारसामाजिक

खाकी वर्दीतील देवमाणूस अमोल गुंडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

उपविभागीय वाहतूक शाखेचे प्रमुख आणि सेवाभावी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे यांना सामाजिक कार्य आणि कर्तव्यनिष्ठतेसाठी राज्यस्तरीय ‘कर्मजित पुरस्कार 2025’ ने गौरविण्यात आले.

जनकल्याण बहुउद्देशीय फाऊंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता पुणे येथील वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.

प्रामाणिक कार्यशैली, सेवाभाव आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या निकषांवर गुंडे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना एका अपघातग्रस्ताला ए-नेगेटिव्ह रक्ताची तातडीने गरज होती. तेव्हा गुंडे यांनी स्वतः रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला. या प्रसंगाची दखल घेत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे ‘खाकी वर्दीतील देवमाणूस’ म्हणून कौतुक केले होते.

सन्मान सोहळ्याला निवृत्त लेफ्टनंट जनरल गोखले, निवृत्त पोलीस उपायुक्त शहाजीराव पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि जनकल्याण फाऊंडेशनचे संस्थापक आशुतोष अभिजीत संकाये पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुंडे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल प्रदान करण्यात आली.

कर्तव्याबरोबरच समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्या गुंडे यांच्या या सन्मानाबद्दल उमरखेड परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button