अपराधउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

पैशांची देवाणी-घेवाण आणि ट्रॅक्टरच्या अवजारांच्या वादातून एका ७५ वर्षीय वृद्धाची गळा दाबून हत्या

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद- पैशांची देवाणी-घेवाण आणि ट्रॅक्टरच्या अवजारांच्या वादातून एका ७५ वर्षीय वृद्धाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बोथा (सा) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोफाळी पोलिसांनी दोघांना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे.

घटनेचा सविस्तर तपशील: मिळालेल्या माहितीनुसार, मृत दौलत रामा गव्हाणे (वय ७५, रा. बोथा) हे गावात एकटेच राहत होते. त्यांचे नातू रजनीश कैलास गव्हाणे यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार, आरोपी परमेश्वर साहेबराव मोरे (वय ३०) याने दौलत गव्हाणे यांच्याकडून ट्रॅक्टरची अवजारे वापरण्यास घेतली होती, तसेच वेळोवेळी रोख रक्कमही घेतली होती. या वस्तू आणि पैसे परत करण्यावरून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. दिनांक २३/०४/२०२६ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास फिर्यादी रजनीश गव्हाणे यांना माहिती मिळाली की, त्यांच्या बोथा येथील घराला बाहेरून कडी लावलेली असून आत काहीतरी गैरप्रकार सुरू आहे. नातेवाईकांसह घटनास्थळी पोहोचले असता घराला बाहेरून कडी लावलेली दिसली. तत्काळ पोफाळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलिस कारवाई पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने घराचे दरवाजे उघडले. तेव्हा दौलत गव्हाणे हे खाटेवर मृतावस्थेत आढळले. घराचा आतील दरवाजा तोडून पोलिसांनी तपासणी केली असता, तिथे लपून बसलेले परमेश्वर साहेबराव मोरे (वय ३०) आणि विनोद कोंडबा गव्हाणे (वय २५) हे दोघे मिळून आले.

कोणत्याही डिजिटल जाहिरात साठी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च संपर्क साधावा

हत्येचे कारण:- आरोपी परमेश्वर मोरे याने घेतलेले पैसे आणि ट्रॅक्टरची अवजारे परत करण्यासाठी मृत दौलत गव्हाणे यांनी तगादा लावला होता. याच रागातून आरोपींनी संगनमत करून रात्री ९:०० ते १०:३० च्या दरम्यान वृद्धाचा तोंड व गळा दाबून खून केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दौलत गव्हाणे यांना पुसद येथील सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रजनीश गव्हाणे यांच्या तक्रारीवरून पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोफळी पोलिस करत आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!