उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रशहरसामाजिक

सम्यक बुद्ध विहार येथे माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड (दिनांक ३ जानेवारी) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार मध्ये मुलींची पहिली शाळा काढणाऱ्या माता सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची १९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच स्त्रीमुक्तीच्या जनक पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना उपस्थित रमामाता महिला मंडळ ज्येष्ठ महिला मंडळ तसेच भंते कीर्ती बोधी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर भदंत कीर्ती बोधी यांच्या थोडक्यात प्रकाश टाकून प्रवचन केले.

यावेळी हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका), सिद्धार्थ दिवेकर पत्रकार तथा (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड), उषाताई इंगोले अध्यक्ष रमामाता महिला मंडळ, शांताबाई दिवेकर,

जिजाबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव,भारती केंद्रेकर, मधुबाला दिवेकर, उज्वला धबाले, यशोधरा धबाले, जानकाबाई इंगोले, शांताबाई दिवेकर, आनंदाबाई दिवेकर, शोभा मुनेश्वर, भारताबाई दिवेकर, आशाबाई दिवेकर, साधना पाईकराव इत्यादी अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!