लाखनी येथे द वर्ल्ड अबॅकस वर्ड चे उद्घाटन संपन्न….

दिनांक 12 मे, लाखनी प्रतिनिधी – परिसरात अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी नामदेव घोडमारे सर यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने द वर्ल्ड अबॅकस वर्ड लाखनी चे संचालक मा .नामदेव घोडमारे सर मागील पाच वर्षा पासून सतत अविरत कार्य करीत आहेत ,

क्लास च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासु वृत्ती निर्माण करने , कलागुणांना वाव देने , सुप्त गुण ओळखून चालना देने ,शैक्षणिक उपक्रमात सहभाग वाढविणे , निरोगी आरोग्यासाठी योगा व ध्यान उपक्रम राबविने , स्पर्धा मध्ये टिकण्यासाठी सक्षम बनविने , व्यसनापासून दूर ठेवणे , विध्यार्थी व पालक यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण करणे , तसेच त्यांच्या समस्या चे निराकरण करणे ,या सर्व बाबतीत घोडमारे सर मागील अनेक वर्षे कार्य करीत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून 12 मे रोजी द वर्ल्ड अबॅकस वर्ड क्लासेस चे उद्घाटन करण्यात आले ,कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.डॉ. बी एस चौधरी सर (समर्थ महाविद्यालय लाखनी ) हे होते , प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्निल गजभिये सर (द वर्ल्ड अबकस क्लास ) , अभय डी रंगारी( कवी, लेखक, मुक्त पत्रकार, अनेक पुरस्काराचे मानकरी )

,सौ.नयना ताई चौधरी (मार्गदर्शक विद्यार्थी संघटना ) हे होते , कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते , कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मा . डिलेश्वरी ढोणे यांनी केले , सदर कार्यक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे , भविष्यात असेच नवोपक्रम राबविण्यात येणार आहेत नामदेव घोडमारे सर यांनी आमच्या प्रतिनिधी ला सांगितले .
