महायुतीचे किसन वानखेडे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ थाटात
✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518
✍️ सिद्धार्थ दिवेकर (सहसंपादक) मो.9823995466
ढाणकी (दिनांक 9 नोव्हेंबर) भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार किसन वानखेडे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ ढाणकी येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.


सर्वप्रथम रिबीन कापून आणि आराध्यांना माल्यार्पण करून, कार्यालयात छोटेखानी बैठक घेण्यात आली.या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी आमदार उत्तमराव इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा अध्यात्मिक आघाडीचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष योगी शाम भारती महाराज हे होते.

यावेळी उपस्थित महायुतीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना श्रीधर पाटील देवसरकर, नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, योगी श्याम भारती महाराज, उत्तमराव इंगळे यांनी उद्बोधन केले. महायुतीचे उमेदवार किसनराव वानखेडे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जयस्वाल यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील मांजरे यांनी केले.यावेळी भाजपा सहकार आघाडीचे, ढाणकी शहर अध्यक्ष महेश पिपंरवार तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते, युवा मोर्चा युवा मोर्चा महामंत्री रोहित वर्मा, भाजपा ज्येष्ठ नेते आनंदराव चंद्रे, भाजपा गटनेते संतोष भाऊ, नितिन ठाकूर शिवसेना शहराध्यक्ष, नगरसेवक बाळू योगेवार यांसह भारतीय जनता पार्टी ढाणकी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
