द बुद्धिस्ट रिटायर असोसिएशन च्या उमरखेड यांच्या नेतृत्वात मध्ये ६९ वा धम्मचक्र परिवर्तन दिन परिवर्तन दिन साजरा
उमरखेड शहरामध्ये आज दिनांक 2/ 10/ 2025 रोजी द बुद्धिस्ट रिटायर असोसिएशन उमरखेड यांच्या नेतृत्वात मध्ये ६९ वा विजया दशमी , धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व कर्मचारी जमा होऊन बुद्धिस्ट रिटायर असोसिएशनचे अध्यक्ष श्री यशवंत काळबांडे सर यांच्या नेतृत्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यचे पुतळ्याचे पूर्ण सजावट करण्यात आली होती.

व पंचशील श्री व्ही टी मुनेश्वर, व श्री आत्माराम हापसे, ह्यनी पंचशील ध्वजफडकून सेवानिवृत्त सुभेदार मेजर मनवर,व सर्व सेवानिवृत्त कर्मचारी ह्यानी महामानव डॉ बाबासाहेब ना हार अर्पण करून, भारतीय बौद्ध महासभा चे श्री धम्मदीप काळबांडे धम वंदना घेऊन व समता सैनिक दलाचे मेजर राजेसाहेब पंडित ,

मेजर श्री मिलिंद बरडे साहेब ह्यनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यना मानवंदना देण्यात आली आहे सदर कार्यक्रमास द रिटायर्ड बुद्धिष्ट कर्मचारी संघटना चे व इतर संघटना चे पदाधिकारी व धम्म उपासक व उपसिका मोठया संख्येने उपस्थित होत्या

सदर कार्यक्रमाचे वृतांकन सेवानिवृत्ती सा पोलीस उपनिरीक्षक श्री दिपक कांबळे ह्यांनी केले.सर्व सेवानिवृत्त कर्मचारी सदस्य ह्यांनी सदर आर्थिक योगदान देऊन कार्यासाठी सर्वांनामदत केल्या बदल सर्वाचे आभार. धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा . 💐 नमो बुद्धाय,जयभीम 💐
