उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

बिटरगाव पोलिसांनी गर्भवती महिलेला दिले जीवदान

✍🏻 करण भरणे सर (बिटरगाव ढाणकी प्रतिनिधी)

ढाणकी शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्ते आठरी पुला वरून पाणी वाहत आसल्याने पुला पाळी कडे अडकून पडले होते. पुलावरून पाणी वाहत असल्याने रुग्णाला उपचार मिळणे कठीण झाले त्यामुळे कुरोळी येथील गर्भवती महिला सविता करण राठोड व तिचा पती इतर सहकारी पाणी उतरण्याची वाट पाहत राहिले,

परंतु पाणी उतरत नसल्याने अखेर याची कल्पना बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना फोन वरुण दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी आपले सहकारी मोहन चाटे, रवी गिते, प्रवीण जाधव इतर पोलीस कर्मचारी यांना घेऊन खारुस रोड वरील नाल्या कडे रवाना झाले.

परंतु पुराचे पाणी ढाणकी गावातील किरण नगरीं पर्यंत आल्याने पुराच्या पाण्यातून सविता करण राठोड या गर्भवती महिलेला सायंकाळी 7 वाजता रात्रीच्याअंधारात आणणे फार मोठे जिकरीचे काम होते.थोडे जरी कमी जास्त झाले तर पाण्याचा प्रवाह वाचवणाऱ्याला सोबत नेले असते.

आपल्या जीवाची कोणतीही परवा न करता ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस शिपाई मोहन चाटे, रवी गिते व गावकरी यांनी गरोदर महिलेला आठरी च्या प्पूलावरील पाण्यातून अगदी लहान लेकरा प्रमाणे उचलून आणून दवाखान्यात भरती केले.त्यामुळे गर्भवती महिलेचा जीव वाचला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!