उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशहरसामाजिक

पावसामुळे बंदी भागातील प्रवासी व विद्यार्थी अडकले ढाणकीत

✍🏻करण भरणे सर (बिटरगाव ढाणकी प्रतिनिधी)

ढाणकी:- गावा जवळून वाहणाऱ्या आठरी नाल्या च्या पुलावरून पाणी वाहत असल्याने, सकाळी शाळेत आलेले विद्यार्थी, बाहेरगावावरून आलेले प्रवासी यांना ढाणकी येथील बस स्टॅन्ड वर, पुलावरील पाणी उतरण्याची तब्ब्ल सहा तास वाट पाहावी लागली.

पुलावरील पाणी काही कमी होत नसल्याने प्रवासी यांना ढाणकी येथेच आपला मुक्काम करण्याची वेळ आली.बंदी भागातील अनेक गावे ढाणकी नगरीशी जोडलेले असल्याने, त्यांना तालुक्याला जाण्यासाठी ढाणकी येथून जावे लागते.

दोन दिवसा पासून वरुण राजा मनसोक्त बरसत असल्याने, आज सकाळ पासून पुलावरून पाणी वाहत होते.उमरखेड बस आगाराच्या काल रात्री गेलेल्या बसेस मोरचंडी, गाडीबोरी, एक स्कूल बस नाल्या च्या पलीकडे अडकून पडली.

सकाळी शाळेत गेलेले शिक्षक, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे सुद्धा आटरी नाळ्याच्या पलीकडे अडकून पडले. ज्ञानज्योती इंग्लिश मेडीयम शाळेचे 50 विद्यार्थी पुलावर पाणी आल्याने शाळेत अडकून आहेत. कस्तुरबा गांधी कन्या शाळेच्या मुली पुलावर पाणी आल्याने ढाणकी शहरात अडकून आहेत.

संबंधीत आठरी नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी अनेक वर्षा पासून चालू आहे. परंतु प्रशासन बंदी भागातील गावाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने, साधारण पावसाच्या सरी जरी आल्या तरी बंदी भागातील नागरिकांना ढाणकी शहरात रात्र काढावी लागते.बंदी भागात पोलीस स्टेशन, वन विभाग दोन्ही कार्यालय बिटरगाव येथे असल्याने, दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्याला आपला जीव मुठीत घेऊन कर्तव्यावर जावे लागते. पुलावर पाणी आल्या नंतर रुग्णाला उपचार विना आपला जीव गमवावा लागल्याचे बंदी भागातील नगरिक बोलून दाखवत आहेत.

पुराच्या पाण्यामुळे बंदी भागातील प्रवासी ढाणकी येथील बस स्टॅन्ड वर अडकून असल्याचे कळताच, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा, महेश पिंपरवार,मल्हार चंद्रे, वैभव कोठारी, सुनील मांजरे, पंकज केशेवाड, साई धोपटे, बाळू योगेवार यांनी प्रवाश्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था, आर्य वैश मंगल कार्यालय येथे केली. प्रवाश्यांनी रोहित वर्मा यांचे आभार मानले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!