उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरसामाजिक

उमरखेड तालुक्यात ढगफुटीचा कहर : जनजीवन विस्कळीत, शेतकरी व कष्टकरी वर्गाचे मोठे नुकसान

उमरखेड तालुक्यात ढगफुटीचा कहर : जनजीवन विस्कळीत, शेतकरी व कष्टकरी वर्गाचे मोठे नुकसान

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर

उमरखेड तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. गावोगाव पूरस्थिती निर्माण होऊन अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः नायनाट झाला असून, या हंगामात उत्पादनाची कोणतीही आशा शिल्लक राहिलेली नाही. मजूर, कष्टकरी, गोरगरीब वर्गांच्या घरांमध्ये कंबरभर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी जनावरं वाहून गेल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

या परिस्थितीत लोक हातबल झाले असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल झाल्याचे दिसत नाही. हवामान खात्याने अजून तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीदेखील तहसील प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी अद्याप प्रत्यक्ष पाहणी केली नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे.जनतेच्या मागण्या स्पष्टस्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तहसीलदार व प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून १०० टक्के ओला दुष्काळ घोषित करावा अशी मागणी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी, मजूर, कष्टकरी यांना तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, जनावरं व घरांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत करावी तसेच पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी होत आहे.लोकप्रतिनिधींकडे अपेक्षातालुक्याचे आमदार किसनराव वानखेडे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी या संकटाच्या काळात तातडीने जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे,

शासन स्तरावर ठोस पावले उचलण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.नागरिकांना सूचनासततचा पाऊस आणि वाढणारे पूरपाणी लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता जपावी, अनावश्यकपणे घराबाहेर न पडता प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.🌧️ एकंदरीत, उमरखेड तालुक्यातील ढगफुटीमुळे शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडलेले आहेत. शासन व प्रशासनाने तातडीने परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष घालून नुकसानभरपाई व मदतकार्य सुरू करणे हीच सध्याची गरज आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!