करंजी जिल्हा परिषद शाळेत एक पेड माँ के नाम या अभियानांतर्गत वृक्ष दिंडी काढून रोपांची लागवड

आर्या खरातचा वाढदिवसा निमित्त वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा
रोपटे उपटणारे हात झाले, रोपटे संवर्धक
मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे
मानवत तालुक्यातील मौ. करंजी येथील जिल्हा परिषद शाळेत २३ जुलै रोजी एक पेड माँ के नाम या अभिया नांतर्गत वृक्ष दिंडी काढून रोपांची लागवड करण्यात आली.

शाळेत वर्ग ०१ ली ते ४ थी च्या विदयार्थ्यांनी चिंच, करंजी, जांभूळ, बदाम, साग, वड, कडुलिंब अशा विविध प्रकारची ८० झाडे या चिमुकल्यांच्या मदतीने त्यांच्या शेतात, घरी या इवल्याशा हातांनी मातीत रुजवली यावेळी विद्यार्थीनी आर्या खरात हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

वाढदिवसा निमित्त पालकांनी होणारा वाढदिवसासाचा अवाढव्य खर्च न करता वाढदिवसाचे औचित्य साधत एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत आर्या खरात हिचा वाढदिवस वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला व येणाऱ्या काळात वादळात, पावसात, उन्हात पुन्हा या गावात नंदनवन करण्यासाठी वृक्ष या मातीत रुजेल आपलेपणा कायम जपला जाईल मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात झाडा विषयी आणि आपल्या माणसा विषयी उद्या हीच झाडे आणि हात कायम सावली धरतील,

त्यामुळे या रोपट्यांची निगा घेऊ आणि त्यांना घडवू आणि वाढवूया असे मत यावेळी आर्या खरातचे पालक तथा मुख्याध्यापक विलास खरात यांनी यावेळी व्यक्त केले.
