ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिकसन्मान सत्कार

के. के. एम. महाविद्यालयात करीअर कट्टाचे अध्यक्ष डॉ. शितोळे यशवंत यांचे व्याख्यान संपन्न

मानवत / प्रतिनिधी प्रविण घागरे

मानवत (दिनांक 23 जुलै) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टाचे अध्यक्ष डॉ. यशवंत शितोळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन 22 जुलै रोजी महाविद्याल यात करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी वडचकर डॉ. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शितोळे म्हणाले की,

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याच्या माध्य मातून अनेक सर्टिफिकेट कोर्स चालवले जात असतात एम.पी. एस. सी. यू. पी. एस. सी बरोबरच उद्योजक आपल्या भेटीला आयएस आपल्याला भेटीला या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला चालना अनेक उपक्रम असून या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांनी केले तर प्रास्ताविक करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. पंडित लांडगे यांनी केले.

या प्रसंगी डॉ. गिरासे संदीप, डॉ योगेश बागुल, डॉ. कुकडे सुनीता, डॉ. जाधव विनायक, प्रा. चोपडे विनायक इत्यादी कर्मचारी व विध्यार्थी बहु संखेने उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल वाघमारे यांनी केले तर आभार प्रीती उफाडे यांनी मानले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!