ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

उमरखेड येथे हजारोच्या संख्येत आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव भव्य एल्गार मोर्चा

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

(एल्गार मोर्चात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांचे फ्लेक्स झळकले)

(आदिवासी आरक्षण बचाव कार्य निष्पादन समिती सर्व आदिवासी समाज उमरखेड व महागांव कडून एसडीओ यांना निवेदन)

उमरखेड (दिनांक 19 सप्टेंबर) महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमाती (S.T.) प्रवर्गात आरक्षण मिळविण्याकरीता काही जाती शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, लोकप्रतिनिधी देखील मत लालसेपोटी शिफारस पत्र देत आहेत, मराठा समाजाचे आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटीयरचा आधार घेऊन मराठा समाजास आरक्षण देण्याविषयीचा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बंजारा, बंजारी, लमाण, वंजारी, वडार, कैकाडी, धनगर, गोपाळ व गोसावी अशा अनेक तत्सम जाती अनुसूचित जमाती (S.T.) प्रवर्गात आरक्षण मिळविण्याकरीता मोर्चे काढूत आहे.

अनुसूचित जमाती (S.T.) प्रवर्गात आरक्षण मिळविण्याकरीता जे निकष आहेत त्या निकषाची पूर्तता कोणतीही जात करत नाही.कलम ३४२ नुसार राष्ट्रपतीच्या अधिसुचनेव्दारा एखादया राज्यातील जमातींना अनुसूचित जमाती म्हणून घोषित करावयाचे झाल्यास त्यासाठी संसदेत कायदा पार व्हावा लागतो. कोणत्याही समाजाला वा जातीला थेट अनुसूचित जमाती (S.T.) प्रवर्गात आरक्षण मिळत नाही. महाराष्ट्राती बंजारा, बंजारी, लमाण, वंजारी, वडार, कैकाडी, धनगर, गोपाळ व गोसावी या जातीची ही मागणी असंवैधानिक आहे.

अशा प्रकारचे निवेदन एसडीएम यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले. यावेळी एसटी प्रवर्गातील आदिवासी समाज हजार संख्येने या आरक्षण बचाव भव्य एल्गार मोर्चात सहभागी झाला होता.

चौकट:- मुख्य मागणी – महाराष्ट्रातील कोणत्याही अनुसूचीबाहेरील जातीचा अनुसूचि जमाती (S.T.) प्रवर्गात समावेश करण्यात येवू नये व मुळ आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवावे.]

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!