आरोग्य उत्तम राखण्यासाठी नियमित योग महत्त्वाचा; योग शिक्षक सूर्यकांत माळवदे

✍🏻प्रविण घागरे (मानवत / प्रतिनिधी)
मानवत (दिनांक २२ जून) येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा या प्रयोगशील विद्यालयामध्ये २१ जून रोजी आंतर राष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणा मध्ये साजरा करण्यात आला.

या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यालयांमध्ये मानवत तालुक्यातील सुप्रसिद्ध योगशिक्षक श्री. प्रवीण कहेकर, श्री. सूर्यकांत माळवदे हे प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांच्या वतीने सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये विद्यार्थ्याकडून योगासनाचे विविध आसने करून घेण्यात आली.
यावेळी योग शिक्षक सूर्यकांत माळवदे यांनी आपल्या मार्गदर्शनातून आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग महत्वाचे हे पटवून दिले.याबरोबरच मा. श्री प्रवीण कहेकर यांनी देखील योगासनाचे दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. व्ही. ओ इंगोले, यांनी तर सूत्रसंचालन माध्यमिक सांस्कृतिक प्रमुख आर एस फाटे यांनी तर आभार प्राथमिक सांस्कृतिक प्रमुख श्रीमती डी. आर भावसार यांनी केले. विद्यालयाच्या प्रथेप्रमाणे पुस्तकरुपी ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी, पर्यवेक्षक श्री. व्ही. एल शिंदे यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
