ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

माहूर तालुक्यातील मछिंद्र पार्डी येथील युवकावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल

✍️समाधान कांबळे (माहूर प्रतिनिधी)

माहूर (दिनांक 22 जून) तालुक्यातील मछिंद्र पार्डी येथील वीरेंद्र गुलाबसिंग ठाकूर या युवकावर ॲट्रोसिटी अंतर्गत तर अन्य चार जणांवर भारतीय न्यायसहीते च्या विविध कलामान्वे गुन्हा माहूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

वानोळा तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील दीपक उर्फ सोनू नामदेव तोडसाम व मछिंद्र पार्डी येथील गोलू फोटोग्राफर हे पुणे येथील खाजगी कंपनीत कामाला होते पंधराशे रुपये तीन दिवसाची मजुरी देण्या घेण्यावरून वाद होता. या वादावरून मछिंद्र पार्डी गावातील वीरेंद्र ठाकूर व इतर चार जणांनी दीपक उर्फ सोनू यास कट रुजून जीवे मारण्याचा बेत आखला होता. सोनू तोडसामला फोन करून त्याचे लोकेशन घेण्यात येत होते.

वीरेंद्र ठाकूर व इतर चार जण जुनापाणी चे घाटात दबा धरून बसल्याचे कळाले,सोनू तोडसामने मोटरसायकल वेगाने चालवून पळ काढला व जीव वाचविला आणि वानोळा येथील घरी पोहोचला. त्यानंतर वीरेंद्र ठाकूर यांनी सोनू तोडसाम यास फोनवरून जातीवाचक शिवीगाळ केली व जिथे दिसेल तिथे ठार मारण्याची धमकी दिली.

तेव्हा दिनांक 18 /6 /2025 रोजी माहूर पोलीस स्टेशनला रेकॉर्डिंग नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी रीतसर अर्ज दिला आणि ॲट्रोसिटी व भारतीय न्याय संहिता नुसार विहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विरेंद्र ठाकूर यास अटक करून नांदेडच्या न्यायालयीन तुरुंगात रवाना करण्यात आले आहे तर बाकीचे चार जण फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे या धाडसी कारवाई बाबत कौतुक करण्यात येत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामचंद्र मळगणे हे करीत असून त्यांना पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण हे सहकार्य करीत आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!