गो. सी. गावंडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक २१ जून) गो. सी. गावंडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांना प्रा. ए . ए. फुलबांधे कनिष्ट महाविद्यालयात क्रीडा विभाग यांनी योगाचे महत्त्व सागितले, प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगा करिता काही वेळ देऊन आपली शारीरिक व मानसिक क्षमता वृद्धिंगत करून निरोगी रहा आणि आनंदी राहा असे संबोधित केले.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व योगासन व प्रणायम बद्दल माहिती देण्यात आली. योग प्रशिक्षणासाठी विशेष करून एन.सी.सी.चे विद्यार्थी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.

सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. माधवराव बी. कदम यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला.

त्याचबरोबर योग तज्ञ प्रा. ए .ए. फुलबांधे त्यांच्या सोबत शकील सर, प्रो. डॉ. पी.वाय.अनासाने, प्रो. डॉ. डी. व्हि. तायडे, प्रा.एस.एस. पाचकुडके (एन.सी.सी.कॅप्टन ) , प्रा. डॉ. आर. जे. डहाके, प्रा. डॉ. एस . एन. चेडे, प्रा. डॉ. पी. डी. शिरभाते, प्रा. डॉ. के. एस. सोनटक्के, प्रा. डॉ. पी डी वंजारे, प्रा. डॉ. टी. एम. भगत, प्रा. , प्रा. डॉ. नवीन जांभेकर यांनी कार्यक्रसाठी मोलाचे योगदान दिले.
