ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशहर
मानवत ते चिंचवड बस नव्याने सुरू
✍️प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी)

पाथरी आगाराला राज्य परिवहन मंडळा तर्फे १४ नविन बसेस मिळाल्या असुन त्याचा शुभारंभ नुकताच पाथरी मतदार संघाचे आमदार राजेश दादा विटेकर व विवीध लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मानवत ते चिंचवड ही नवीन बस सुरू झाल्यामुळे अनेक प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.


सदरील बस मानवत येथे आली असता मानवत बसस्थानकाचे वाहतून नियंत्रक कक्ष अधिकारी श्री. माणिकराव तेलभरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून बसचा शुभारंभ करण्यात आला व बसचा चालकाचा आणि वाहकाचा यावेळी सत्कार करुन गाडी मार्गस्त करण्यात यावेळी मानवत वाहतून नियंत्रक कक्ष अधिकारी श्री. माणिकराव तेलभरे, श्री. अमोल सुर्यवंशी, यांच्या सह प्रवाशी व चालक वाहक उपस्थित होते.
