पाथरी आगाराला राज्य परिवहन मंडळाने दिलेल्या १४ नविन बसेसचा शुभारंभ

✍️प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)
पाथरी:- (दि. २९ मे) आगाराला राज्य परिवहन मंडळाने दिलेल्या १४ नविन बसेसचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी नव्या लालपरीमधून आमदारां साठीच्या आरक्षित सीटवर बसून प्रवास करत बसची माहिती घेतली.
या नवीन बसमध्ये प्रवाश्यांच्या सोयीसाठी आरामदायक सीट, मोबाईल चार्ज करता येईल अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
आरामदायक आणि आधुनिक सुविधा असणाऱ्या बस प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल शासनाचे आणि राज्य सरकारचे मनःपुर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, मानवत नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज भैया आंबेगावकर, पाथरी आगाराचे आगार प्रमुख श्री. हनुमंत चपटे, बाजार समितीचे माजी सभापती माधवराव जोगदंड, संजय रनेर, बाळासाहेब कोल्हे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ढगे, बाजार समितीचे संचालक रामप्रसाद कोल्हे, अजिंक्य नखाते, संतोष कोल्हे, विष्णुपंत यांच्या सह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
