ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवत

मानवत पालिकेद्वारे मान्सूनपूर्व कामांना सुरुवात

मानवत पालिकेद्वारे मान्सूनपूर्व कामांना सुरुवात

(मोठे व लहान नाले साफसफाईचे काम युध्दपातळीवर सुरु)

प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी)

मानवत (दिनांक 29 मे) नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती. कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारपासून शहरातील विविध भागांमध्ये मान्सूनपुर्व कामांना सुरुवात करण्यात आली.

मानवत शहरातील काही भागात नाले आणि गल्लीतील नाल्यात गाळ साचलेला असतो, अनेक भागात काटेरी झाडे, कचरा साठलेला असतो, परिणामी पावसाळ्यात शहरातील अनेक भागात पाणी जमा होते. हे पाणी जमा होवू नये साठी मानवत नगर पालिके कडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली.

शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये जेसीबी तसेच पोकलॅनच्या सहाय्याने शिवाजी नगर, जिजाऊ नगर , मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले मोठे नाले तसेच शहरातील विविध भागातील मोठ्या नाल्यातील पूर्ण साफसफाई करण्यात आली. या साफसफाई कामामूळे शहरात पावसाळ्यात शहरातील नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता पालिकेकडून घेण्यात येत आहे.

साफसफाई नाले, गल्लीतील नाल्या, शहरातील जागो जागी काटेरी झाडे यांची पूर्ण सफाई करण्यात येणार आहे अशी माहीती मानवत नगरपालिकेच्यावतीने देण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी कोमल सावरे , नगर अभियंते सय्यद अन्वर , स्वच्छता निरीक्षक मुंजा गवारे , सुनील कीर्तने, दीपक भदर्गे , राम दहे, बळीराम दहे आदींची उपस्थिती होती.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!