ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रसामाजिक

जिजानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवन्याचे कार्य केले

(गयाबाई एकनाथराव आव्हाड यांचे प्रतिपादन)

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक १९ जानेवारी) जिजानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहचव न्याचे कार्य व संविधानाची मूल्य जपण्यासाठी अथक प्रयत्न करत अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी जीवनभर रस्त्यावरची लढाई लढून हक्क आणि अधिकार मिळवून दिले असे प्रतिपादन श्रीमती गयाबाई एकनाथराव आव्हाड यांनी केले.

त्यांचे हेच कार्य आपण पुढे ही सुरु ठेवावे असे ही यावेळी त्या म्हणाल्या मानवी हक्क अभियान व साथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या कर्मवीर अ‍ॅड. एकनाथजी आव्हाड यांच्या ६९ व्या जयंती निमित्त त्या बोलत होत्या.

यावेळी संघर्ष कार्यकर्ता सन्मान पुरस्कार सोहळा पाथरी येथील हॉटेल सिटी प्राइड येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून के. हरिदास हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मच्छिंद्र गवाले मानवी हक्क अभियानचे राज्यकार्याध्यक्ष मानवी हक्क अभियानचे महासचिव यशवंत फडतरे हे होते.

यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ येथील प्रमुख कार्यकर्ते यांना कर्मवीर अ‍ॅड. एकनाथ आव्हाड संघर्ष कार्यकर्ता सन्मान पुरस्कार देण्यात आला ३६ कार्य कर्त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी पोचिरमाम कांबळे यांच्या सूष्ना सुरेखाताई चंदर कांबळे, शकुंतला बाळकृष्ण कांबळे, कालकथित लोकनेते विजयराव वाकोडे यांच्या वीरपत्नी अल्काताई विजय वाकोडे या तीन महिलांना विरपत्नी पुरस्कार प्रदान करण्यात आला तर परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचे नुकतेच परभणी येथे साविंधान वाचण्यासाठी आपले बलिदान दिले त्यांच्या माता विजयाताई व्यंकट सूर्यवंशी यांना वीरमाता पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार रघुनाथजी कसबे यांनी केले तर सूत्रसंचलन मारोती साठे यांनी केले व आभार अजय हिवाळे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानवी हक्क अभियानचे तालुका अध्यक्ष भीमराव वैराळे, मानवत तालुका अध्यक्ष अजय हिवाळे, उपाध्यक्ष बाळासाहेब नवगीरे यांच्या सह मानवी हक्क अभियानच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!