Uncategorized

हरदडा अमृतेश्वर महादेव मंदिर येथे भाजपाच्या प्रचाराच्या भव्य शुभारंभ

(दिनांक 4 नोव्हेंबर)उमरखेड व महागाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार (भाजपा) किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ हरदडा अमृतेश्वर महादेव मंदिर येथे आज दिनांक 4 नोव्हेंबर 2024 सकाळी दहा वाजता श्रीफळ फोडून भव्य शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे, उमरखेड महागाव विधानसभेचे समन्वय माजी आमदार उत्तमराव इंगळे, आमदार नामदेवराव ससाने, बळवंतराव नाईक, महेशभाऊ काळेश्वरकर, डॉ.अंकुश देवसरकर, बबलू जाधव, सुदर्शन रावते, महेश पिंपरवार, माजी सभापती प्रवीण मिराशे, चितंगराव कदम आणि उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बंदी भागातील अनेक तरुणांनी भाजपमध्ये इनकमिंग केल्याने त्यांचे उत्तमराव इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी मतदारांना भावनिक साथ घालून आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे.तेव्हा सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करावे.असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्यासह मान्यवरांनी केले. या कार्यक्रमाला उमरखेड महागाव विधानसभा विधानसभा क्षेत्रातील व बंदी भागातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!