ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्र

घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या शासनाचे निर्देश

(जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 20 तारखेपासून घरकुल लाभार्थ्यांना मिळणार वाळू – तहसीलदार किशोर यादव लागले कामाला..!)

(घरकुल लाभार्थ्यांत आनंदाचे वातावरण)

श्रीक्षेत्र माहूर (दिनांक १५ मे) महाराष्ट्र राज्य सह नांदेड जिल्ह्यात मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यासाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना आदेशित करून तत्काळ वाळू गट निश्चिती करत घरकुल लाभार्थ्यांना 20 मे ते 9 जून पर्यंत निश्चित केलेल्या वाळू गटातून वाळू उपलब्ध करून देण्याचे निश्चित झाल्याने हजारो घरकुल लाभार्थ्यातून महाराष्ट्र शासनासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला यांचे सह तहसीलदार किशोर यादव यांचे अभिनंदन होत आहेपंचायत समिती माहूर अंतर्गत जवळपास सात हजार घरकुल मंजूर असून माहूर शहरातही अकराशे तीन घरकुले मंजूर असून सर्वच घरकुलांचे काम सुरू असल्याने तसेच दोन महिन्यापासून वाळू उपलब्ध नसल्याने घरकुल लाभार्थी प्रचंड अडचणीत आले होते पिवळी वाळू पंधरा हजार रुपये बरसने घेणे शक्य नसल्याने पावसाळा तोंडावर येऊन ठेपला त्यामुळे घरकुल लाभार्थ्यात घबराटीचे वातावरण पसरले होते.

परंतु शासनाने अनेक वेळा धोरण बदलवत घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच बरास मोफत वाळू देण्याचे कबूल केलेले असल्याने त्यावर आता शासनाचा शासनाचे स्पष्ट निर्देश आल्याने सर्व घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार तहसीलदार किशोर यादव यांनी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्याकडून घरकुल लाभार्थ्यांची यादी मागविली असून वाळू वाटप समितीची बैठक होऊन निश्चित केलेल्या वाळू गटातून घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी समितीने सुचविलेल्या प्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने घरकुल लाभार्थ्यातून महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन होत आहे.

चौकट:- घरकुल लाभार्थ्यांनी निश्चित केलेल्या वाळू गटातून रीतसर परवानगी घेऊन आपापल्या वाहनाद्वारे वाळू वाहनात भरण्याची व्यवस्था करून वाळू घेऊन जावे काही अडचण आल्यास तात्काळ संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. – किशोर यादव (तहसीलदार तहसील कार्यालय माहूर)

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!