ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

शहीद स्मारक बांधण्याचा घाट राजकीय बळाचा वापर करून सुरु

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

पुसद (दिनांक 19 मे) मौजा बेलोरा ता पुसद जि. यवतमाळ येथे ग्राम पंचायत अनधिकाऱ्याचे ठरावाला अधिन राहुन शहीद स्मारक बांधण्याचा घाट राजकीय बळाचा वापर करून सुरु आहे.

हयापूर्वी सुद्धा माहे ऑक्टोबर 2024 मध्ये ह्याला अनुसरून उच्च वर्णीय समाजाने बौद्ध समाजावर अन्याय करून मारहाण करून खोट्या प्रकरणात बौद्ध व्यक्तींना गुंतविले आहे. शासन निर्णय असे सांगतात की, कोणत्याही पुतळा/स्मारक उभारणी बाबत स्थानिक व्यक्तींचा विरोध असल्यास तसे काम करू नये. हया शहीद समारकाला विरोध नसून काही जागा हि बौद्ध विहारास अत्यंत गरजेची आहे.

तरी पण राजकीय पाठबळ घेत बेलोरा येथील उच्च वर्णीय ग्रामस्थ हे स्मारकाचे नावाखाली बौद्ध व्यक्ति, व्यक्ति समूह आणि बौद्ध विहारा चे वर अन्याय करत आहेत. ज्या जागेवर स्मारक होणार आहे त्याची मालकी ग्राम पंचायत बेलोराची नाही. हया प्रकरणावरून पूर्वीच गावातील शांतता भंग झाली होती.

सदर प्रकरणात मा. दिवाणी न्यायालय पुसद ह्यांचे न्यायालयात रे. दि. मु. नं. 67/2025 हा सरकार विरुद्ध दाखल आहे. हया दिवाणी दाव्याची माहिती प्रशासनास देण्यात आली आहे. आता देखील राजकीय दबाव व प्रशासनास हाताशी धरून स्मारकाचे नावाखाली राजकारण करून बौद्धावर अन्याय होत आहे. त्या जागेवर मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ ह्यांचे आदेश नसतांना जबरदस्ती तारकुंपणाची जाळी लावण्यात आली आहे. ती जाळी कोणी लावली हे रहस्य आहे.

कारण हया जाळी बाबत कोणताही आदेश निविदा नाही. आता दिवाणी न्यायालय प्रकरण न्याय प्रवीष्ठ असताना प्रशासन दिवाणी न्यायालयाचे मानाची गरिमा विसर पडला आहे हे विशेष!

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!