ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्र

वीज कोसळल्याने एकाच जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)

✍️ समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी)

माहूर तालूक्यात दि.१५ मे रोजी दू.२.३० वा अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावूस पडल्याने विज कोसळून संजय कुष्णकूमार पांडे वय ५६ रा.करंजी याचा जागेवरच मुत्यू तर आसोली येथील अमरसिंग रामजी चव्हाण वय ५६ हे जख्मी झाल्याची घटना घडली.

करंजी ता.माहूर येथील रहिवासी संजय कुष्णकूमार पांडे ( शिक्षक). ते मोटार सायकलने उमरखेड येथे बहिनी कडे गेले होते व गावाकडे परत येत असतांना माहूर शहराजवळील मालवाडा घाटातून चालत्या मोटार सायकल क्र. एम एच २९ बि यस ४६८१ वर विज पडल्यांने त्याचा भाजून जागीच मुत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे,यांनी घटनास्थळ गाठुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणला तर दुस-या घटनेत आसोली येथील अमरसिंग चव्हाण ( समाधान जाधव) याचे सालगडी हा अचानक आलेल्या पावसामुळे बैल सोडण्यास गेला असता काही अंतरावर विज पडल्याने त्याना आछ लागल्याने ते जख्मी झाले.

माहूरच्या ग्रामीण रुग्णालय येथे जख्मी वर वैघकिय अधिक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, डॉ बिपीन बाभळे यांनी उपचार केले व पुढील उपचार करीता यवतमाळ येथे पाठविले व डॉ बिपीन बाभळे यानी,संजय पांडे याचे शवविच्छेदन केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!