अपराधउमरखेडताज्या बातम्याभीम टायगर सेनामहाराष्ट्रयवतमाळ

काल दादासाहेब शेळके यांनी पोलिस प्रशासनाला कायदेशीर घोडा लावण्याचा इशारा देताच ॲट्रॉसिटी दाखल

✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक)

(पीडित महिलेला भीम टायगर सेनेने मिळवून दिला न्याय)

उमरखेड (दिनांक 22 एप्रिल) शहरामधील शहीद भगतसिंग वार्ड मधील एका विधवा महिलेला नग्न करून बेदम मारहाण करत जातीवाचक शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे गैरअर्जदार १) जीवन साहेबराव शिंदे,२) मोहन साहेबराव शिंदे,३) बेबाबाई साहेबराव शिंदे,४) ज्योती साहेबराव शिंदे, ५) मंजू कदम, ६) साहेबराव शिंदे सर्व राहणार शहीद भगतसिंग वार्ड उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ,यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार १८९ (२), ११५(२), ३३३, ३५२, ३ (५) अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम १९८९ नुसार ३(१)(r), ३(१)(s) ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असेकी, तक्रारकर्त्या स्वाती अजय इंगळे वय अ. २७ वर्ष, जात-बौद्ध, यांना घरात घुसून नग्न करून बेदम मारहाण व जातीवाचक शिवीकाळ करून जीवाने मारण्याची धमकी देणाऱ्या गैरअर्जदार यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दि. ०७/०४/२०२५ रोजी आपल्या कार्यालयाकडे दिली होती,

पण अद्यापही कोणतीही कार्यवाई न झाल्यामुळे अर्जदार स्वाती अजय इंगळे यांनी भिम टायगर सेना उमरखेड यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली दि. २१/०४/२०२५ रोजी महागाव रोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांच्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसले होते.

पण भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी उमरखेड शंकर पांचाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा करून आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर आमरण उपोषण शामभाऊ धुळे यांच्या हस्ते पीडित महिलेचे आमरण उपोषण सोडविण्यात आले.

चौकट – जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे, करणदादा भरणे (जिल्हा उपाध्यक्ष), सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष) यांच्या अथंग परिश्रमातून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केल्याबद्दल दादासाहेब शेळके यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले.

यावेळी शामभाऊ धुळे, करणदादा भरणे (जिल्हा उपाध्यक्ष), सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष), संदीप विनकरे, देवानंद पाईकराव, कैलास कदम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!