ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवत

इमारत व इतर बांधकाम कामगारांचे साहीत्य (किट) तात्काळ वाटप करा

[महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) संघटनेची मागणी]

✍🏻प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)

मानवत (दिनांक 21 एप्रिल) इमारत व इतर बांधकाम कामगारांचे साहीत्य ( किट) तात्काळ वाटप करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लाल बावटा) संघटनेचा वतीने जिल्हा कामगार अधिकारी यांच्या कडे मागणी करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इमारत व इतर बांधकाम कामगारांचे भांडे, पेटी, किट साहीत्य कार्यालया मार्फतच पाटप करण्यात यावे कारण काही कामगारांची गेल्या आठ ते नऊ महिने झाले आहे.

इमारत व बांधकाम कामगार असल्याची पावती ऑनलाईन नोंदणी असल्याची पावती मिळाली पण त्यांना भांडे, फिट साहीत्य मिळाले नाही कामगारांना दलाल व एजेंट हे दिड ते दोन हजार रुपयांची मागणी करतात व जे कामगार पैसे देतात त्यांचेच भांडे, पेटी, किट साहीत्य दलाल व एजंट मार्फत देण्यात येते व जे कामगार पैसे देत नाही त्यांना मात्र आपल्या कार्यालयात खेटे मारावे लागते

व त्याची वाट पाहुन प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे बांधकाम कामगारांची मोठी आर्थिक लूट होत असून होणारी आर्थिक लुट तात्काळ थांबवावी कार्यालया मार्फत भांडे, पेटी, किट साहीत्य येत्या आठ दिवसाच्या आत तालुक्यातील सावंगी मगर, कोल्हावाडी, सावळी, इतर गावातील कामगारांचे संरक्षण पेटी, संसार उपयोगी साहीत्य भांडे पेटी मोफत करण्यात यावे तसेच परभणीत पुर्वी प्रमाणे नांदखेड रोडला थम घेण्यात यावा

व त्याच दिवशी भांडे, पेटी, फिट साहीत्य बांधकाम कामगाराला वाटप करण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालया समोर बांधकाम कामगारां सह घटनात्मक लोकशाही मार्गाने तीव्र धरणे व निदर्शने करण्यात दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सबंधित याची जबाबदरी पूर्ण प्रशासनावर राहिल.

असा इशारा ही निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लाल बावटा) संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. आसाराम बुरखुंडे, कॉ. लिंबाजी धनले कॉ इंदुमती महाडिक,डि एम झोडपे, नदुभाउ लांडगे, दत्तराव पंडित, उत्तम सुर्यवंशी, मारुती सुर्यवंशी, पांडुरंग चव्हाण, निवृत्ती ढगे, पारुबाई बन्सी कांबळे, पारुबाई आश्रोबा कांबळे, विमलताई कांबळे, सखाराम उफाडे,

भानुदास कांबळे,, लक्ष्मी जाधव, अनुसया तुकाराम जाधव, पार्वती सखाराम जाधव,दता तुपसमुद्रे, आश्रोबा तुपसमुद्रे, दामु तुपसमुद्रे, महादु तुपसमुद्रे, अर्जुन पंडित, तुकाराम ढगे, भारत ढगे, दता ढगे, विठ्ठल पंडित, महादु सुर्यवंशी, विश्वनाथ तुपसमुद्रे, हरिभाऊ जाधव, तुकाराम लांडगे, रामभाऊ पंडित, बालासाहेब पंडित, आश्रोबा वाव्हळे, आशामती सुर्यवंशी यांच्या सह पदाधिकाऱ्यांच्या व कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!