रुग्णसेवक तथा समाजसेवक रविभाऊ साबळे सन्मानित

✍️प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)मानवत (दिनांक 22 एप्रिल) रुग्णसेवक तथा समाजसेवक रविभाऊ साबळे यांना भारतीय संविधान देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त दि. 20/2025 रोजी उघडा महादेव परिसर जनप्रिय कॉलनी कारेगाव रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्मचारी सरकारी पदसंस्था मर्या. परभणी व कास्ट्रटाईब शिक्षण संघटना परभणी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. विठ्ठल भुसारे , केंद्रप्रमुख श्रीमती. मायादेवी गायकवाड , प्राथमिक शिक्षणाधिकारी वाशिम, बाल व्याख्याते कु. आरोही खंदारे पाटील, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध व्याख्याते विलास खरात, अण्णा साहेब जल्हारे विस्तार अधिकारी परभणी, ॲड. मोरे, सतीश कांबळे राज्य सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना यांची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे व्यवस्थापक विश्वनाथ झोडपे यांनी केले तर आभार पतसंस्थेचे सहसचिव राजू कांबळे यांनी मानले.
