अपराधताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत शेळी पालन मध्ये बचत गटाची फसवणूक

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

(उमेद चे प्रभाग समन्वयक तस्लीम शेख यांच्यावर कार्यवाहीची मागणी)

उमरखेड :- (दिनांक 17 एप्रिल) महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून मानव विकास कार्यक्रमांतर्गत महिलांना स्वाभिमानी व स्वावलंबी होण्यासाठी शासन योजना राबवून करोडो रुपये खर्च करत आहे परंतु या पैशाला चुना लावण्याचे काम उमेदच्या प्रभाग समन्वयकाने केल्याने खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील निंगनूर प्रभागातील पिरंजी येथील शिवाजी स्वयं सुरक्षा समूहाला सन 2022 23 मध्ये या योजनेअंतर्गत शेळीपालन व्यवसाय मंजूर झाला परंतु प्राप्त झालेला निधी प्रभाग समन्वयकाने कंपनीला न देता एका व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केले त्यामुळे कोणताही लाभ गटाला मिळाला नाही .प्रभाग समन्वयकाने फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलांनी याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून संबंधित प्रभाग समन्वयकावर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील पिरंजी येथील शिवाजी स्वयं सुरक्षा समूह या गटाला २०२२-२३ मध्ये मानव विकास कार्यक्रम अंतर्गत शेळी पालन व्यवसाय मंजुर झाला होता. त्यात पहिले ३० टक्के निधी ४ लाख ३६ हजार कंपनी मध्ये वर्ग करून कंपनीकडून शंळी घेण्याचे ठरले होते. नंतर ६० टक्के निधी कंपनीला देऊन शेळी घेणार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

उमेद चे प्रभाग समन्वयक तस्लीम ताजु शेख यांनी गटाची दिशाभुल करुन कंपनीला पैसे देऊ नका तुमचे पहिले पैसे कंपनीने खाल्ले असे सांगून मिळालेला निधी शेख अदिल शेख फतरु या व्यक्तीच्या नावे टाकायला लावली परंतु अद्यापही शेळ्या दिल्या नाहीत. संबंधित प्रभाग समन्वयकाने कंपनी शेळ्या देत होती त्यांना पैसे वापस मागा म्हणून खोट्या तक्रारी करायला लावल्या.

योजना आमच्यासाठी आलेली असतांना याचा काहीही लाभ मिळू दिलेला नाही. उलट आमची दिशाभुल करुन आमची फसवणुक केली यावर योग्य ती कार्यवाही करुन आम्हाला न्याय द्यावाअशी मागणी गटविकास अधिकारी किरण कोळपे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

यावेळी समूह गटाच्या निर्मलाबाई भाऊराव जाधव , वंदना किशोर अकोलकर , मंदाबाई विजय मुरमुरे , कविता विनोद आडे , तुळसाबाई गोरखनाथ देवकते ,जिजाबाई तुकाराम सुळ , वंदनाबाई आनंदराव भुसाळ ,सुनिता रामराव लोखंडे , लक्ष्मीबाई दयाराम वाघमोडे , विद्याबाई विकास जाधव , दिपालीबाई गोविंदराव भुसाळे यांनी स्वाक्षऱ्या केले आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!