अपराधताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

माहूर येथे पत्रकारास पोलिसांनी केली धक्काबुक्की

✍️ बबलू भालेराव मुख्य संपादक ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

माहूर (दिनांक १६ एप्रिल) पत्रकार समाधान कांबळे यांना धक्काबुक्की करून, त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन, जबरदस्तीने दोन-तीन तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून, मारहाण करून बळजबरीने सही घेतल्यामुळे, पोलीस उपनिरीक्षक संदिप अणेबोईवाड यांना निलंबित करा.

अशा आशयाचे निवेदन मार्फत पोलीस स्टेशन माहूर यांना मा. पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड तक्रारी निवेदन सादरकरण्यात आले की,दि. १५/०४/२०२५ रोजी दुपारी पत्रकार समाधान कांबळे हे एका निवेदना संदर्भात माहूर पोलीसस्टेशन येथे गेले असता,

माहूर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक संदिप अणेबोईवाड यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘डी. जे चा आवाज का? वाढवला हा राग मनाशी धरून, तू आता भेटलास आता दाखवतो तुला’ असे म्हणत पत्रकार समाधान कांबळे हे अनुसूचित जातीचे असल्यामुळे यांना धक्काबुक्की करत, फरफटत नेऊन त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन दोन ते तीन तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेऊन त्यांच्या विषयी जबरदस्तीने खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला.

तसेच स्वतः पोलीस अधिकारी असल्याने अडचणीत येऊ नये म्हणून स्वतःच्या बचावासाठी स्टेशन डायरीला काही तरी नोंद करून त्यांना मारहाण करून बळजबरीने सही घेतली. असता अशा बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांकडून पत्रकाराला झालेली धक्काबुक्की ही अतिशय निंदनीय बाब आहे. या दोन्हीही घटना माहूर पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्येपहावयास मिळेल.या रेती चोरट्यांकडून पोलीस उपनिरीक्षक संदीप अणेबोईनवाड यांच्या माध्यमातून पत्रकार समाधान कांबळे यांना गुंतवण्याचा प्रयत्न असू शकतो.

अशा पोलीस अधिकाऱ्यांकडून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेचरक्षकच भक्षक झाले आणि पत्रकारांविषयी अशी वागणूक देत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय…? पत्रकारांविषयीअजिबात आदर नसलेल्या अशा बेजबाबदार पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे

अशा आशयाचे निवेदन संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यात युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे देण्यात आले.

प्रतिलिपी म्हणून मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य.मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य. मा. विशेष पोलिस महानिरिक्षक, नांदेड परिक्षेत्र. मा. तहसीलदार साहेब माहूर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर यांना निवेदन देण्यात आले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!