उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

बोरबन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक रॅली काढून जयंती उत्साहात साजरी

✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक १७ एप्रिल) भारतीय राज्यघटनेतील शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन सुमेध बोधी धम्म प्रसारक मंडळ बोरबन,उमरखेड मधील १३४ वी बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने करण्यात आले होते.

तर दिनांक ११ एप्रिल पासून ते १३ एप्रिल पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि १४ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली होती. या भव्य दिव्य मिरवणूक मध्ये विविध जाती धर्माचे लोक हजारोच्या संख्येने सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या मंगलमय जयंतीदिनी अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन रवींद्रभाऊ वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तर हा भव्य दिव्य कार्यक्रमाला सुमेध बोधी युवा मंडळाचे अमोल मंडाळे, आकाश लोणकर, किरण गदणे यांनी आहोरात्र मेहनत घेऊन यशस्वीरित्या पार पाडला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!