ग्रामिण रुग्णालय माहुर चे राज्यात अ`व्दितीय ” यश…!

✍️समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)

माहूर जागतिक आरोग्य दिनाच्या निमीत्त दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सार्वजनीक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध जिल्हयातील आरोग्य विभागामध्ये उल्लेखनिय व उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या संस्थांना विधान परिषदेचे सभापती मा.ना.श्री.राम शिंदे, सार्वजनीक आरोग्य मंत्री मा.ना.श्री. प्रकाश आबीटकर, मा. ना. श्रीमती मनिषा कायंदे, सचिव-१ श्री निपुण विनायक, सचिव २ श्री विजेंद्र सिंह, आयुक्त श्री रंगनाथन नायक डॉ नितीन अंबाडेकर यांच्या हस्ते श्री यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे ग्रामिण रुग्णालय माहुर येथील वैदयकिय अधिक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, डॉ अभिजीत आंबेकर, श्री परमेश्वर जुडे, श्री राम केंद्रे यांना सन्मानीत करण्यात आले.


जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, अतिरीक्त शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, निवासी वैदयकिय अधिकारी डॉ राजाभाऊ बुटटे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामिण रुग्णालयाचे वैदयकिय अधिक्षक डॉ किरणकुमार वाघमारे, वैदयकिय अधिकारी, परीचारीका व रुग्णालयीन कर्मचारी यांच्या अथक व सातत्यपुर्ण परिश्रमामुळे राज्यामध्ये २०२४-२०२५ या वर्षात ३० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयातील वर्गवारीत राज्यामध्ये ३८८ मोठ्या शस्त्रक्रिया करुन व्दितीय क्रमांक मिळविल्याबददल व्दितीय पारीतोषीक देऊन गौरविण्यात आले.
